अमरावती : जिल्ह्यातल्या दर्यापूर आणि अचलपूर तालुक्यामधल्या सांगवा इथले चंद्रभागा ब्यारेज लघू प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी धरण परिसरातच २० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
२००९ पासून या प्रकल्पाचे काम सुरू असून, अजूनही सांगवा - निंभारी - असदपूर - वडगाव - शहापूर यासह अनेक गावांतल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आपल्या भागातील शेतीला १२ महिने पाणीपुरवठा होईल या उद्देशानं गावक-यांनी, चंद्रभागा ब्यारेज लघु प्रकल्पासाठी आपल्या शेतजमिनी दिल्या.
ब्यारेजचं बांधकाम पूर्ण झालं, मात्र या प्रकल्पात शेतजमिनी आणि घरं गेलेल्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. आणि जो काही मोबदला मिळाला तो पण अत्यल्प आहे. बाजारभावानुसार जमिनीचा मोबदला मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.