नागपूर : अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागपूरकर चांगलेच हैराण झाले होते. अचानक पावसाला सुरवात झाली आणि बघता-बघता मुसळधार सरींनी शहराला चिंब भिजवले.
या हंगामात पावसाने अपेक्षेपेक्षा कमी हजेरी लावल्याने शहरात पावसाची २८ % तूट आहे. अश्यातच बरसलेल्या या जल-धारांनी हि तूट काही प्रमाणात भरून निघेल हीच अपेक्षा आहे.
या पुढे देखील अश्याच प्रकारे पावसाने आपल्या उपस्थितीची जाणीव करून द्यावी हि प्रार्थना नागपूरकर वरून देवतेकडे करीत आहेत.