ठाणे : ठाण्यातल्या रिक्षा चालकानं पुन्हा एकदा महिलेला मारहाण केल्याचं पुढे आलं आहे. शेअर रिक्षातून प्रवास करणाऱ्या फिर्यादी तरुणी आणि तिच्या मैत्रिणीने रिक्षा डावीकडे वळवण्यास सांगितली.
मात्र रिक्षा चालकाने रिक्षा डावीकडे न वळविता सिग्नल ओलांडून पुढे उभी केल्यावरून शाब्दिक चकमक झाली. त्यातून हे प्रकरण हातघाईवर आलं. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
या प्रकरणात आपल्याला रिक्षा चालकाने मारहाण केल्याचं संबंधित महिलेने म्हटलं आहे, आपण रिक्षा चालकाचे आयकार्ड खेचल्यानंतर त्याने आपल्याला कानाखाली एवढ्या जोरात मारलं की आपण बेशुद्ध पडलो असंही या महिलेने म्हटलं आहे.