पुणे : पुण्याचा जलतरणपटू रोहन मोरेनं ऐतिहासिक कामगिरी केली. सात महासागर पूर्ण करणारा तो सर्वात युवा जलतरणपटू ठरलाय. जगात आणि आशियामध्ये अशी कामगिरी करणारा पहिला जलतरणपटू होण्याचा मान त्यानं मिळवला. त्याचप्रमाणे ओशियन सेव्हन चॅलेंज पूर्ण करणारा तो जगातील नववा जलतरणपटू ठरला.