समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्याला होणार थेट फायदा, वाचा संपूर्ण प्लान

Samruddhi Mahamarg Second Phase: समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण पार पडणार आहे. 

Updated: May 25, 2023, 07:27 PM IST
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्याला होणार थेट फायदा, वाचा संपूर्ण प्लान title=
Samruddhi Mahamarg 80 Km Shirdi-Igatpuri Stretch Under Phase II To Open On 26 May

Samruddhi Mahamarg Phase 2: मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाचा (Mumbai - Nagpur) दुसरा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. येत्या २६ मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. (Samruddhi Mahamarg)

समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्धाटन अलीकडेच करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार दुसरा टप्पाही प्रवाशांसाठी खुला होत आहे. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर आता शिर्डी ते भरवीर अंतर ४० ते ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून एकूण लांबी ८० किमी आहे. या महामार्गामुळं भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे. 

सांगलीत जेवण बनवण्यावरुन वाद, बायकोने नवऱ्यावर केले सपासप वार; जागीच मृत्यू

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा एकूण ७०१ किमी अंतराचा आहे. त्यातील एकूण ६०० किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. शिर्डी ते भरवीर मार्गावर ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज अशा सुविधा आहेत. 

शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्यात नाशिक, ठाणे. मुंबई येथून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा वेळ वाचणार आहे. कारण दुसऱ्या टप्प्यात भरवीर इंटरचेंजपासून घोटी हे अंदाजे १७ किमी अंतरावर आहे. त्यामुळं इथून येणाऱ्या नागरिकांना शिर्डी गाठणे शक्य होणार आहे.  तसंच, सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे त्या भागातील इतर गावासाठी महामार्गाचा उपयोग होणार आहे. 

पतीचे करोना काळात निधन, दोन वर्षांनी पत्नीने कबर खोदून काढले अवशेष, कारण... 

शिर्डी- मुंबईदरम्यान कामाचा वेग वाढला

समृद्धी महामार्गावरील दोन टप्पे वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्यानंतर आता शिर्डी-मुंबई या टप्प्याच्या कामाचा वेग वाढला आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याचे संकेत मिळताहेत. मुंबई ते भरवीर या उर्वरित २०० किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. सध्या मुंबई ते शिर्डी प्रवासासाठी चार तास लागतात. मात्र, समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे.