मुंबई : महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा आणि शिवसेना एकत्र यावे ही माजी भूमिका पण दोघे एकत्र आल्यानंतर माझं नाव आठवले असताना ते दोघे मला विसरले असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मानातातील शिवशक्ती आणि भीमशक्ती हे स्वप्न साकारायचे असेल तर आम्हाला एक जागा शिवसेनेने उद्धव ठाकरे यांनी सोडावी् अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आरपीआय दोघांच्या मध्ये आहे असंही ते गमतीने म्हणाले.
11 एप्रिल पासून लोकसभा निवडणुकीला सुरूवात होत असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. आचारसंहिताही लागू झाली आहे. युती आणि आघाडीचे मतदारांना खेचून घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. युतीचे राज्यातील उमेदवारही काही दिवसांत घोषित होतील. पण या सर्वांमध्ये रामदास आठवले यांच्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. दोन्ही पक्षांनी माझा विचार करावा. दोन जागा देता येत नसतील तर एक तरी जागा सोडावे अशी माजी इच्छा असल्याचे ते म्हणाले.
तुम्ही निवडणूक लढवणार असेल तर तुम्ही निवडून आले पाहिजे असं मुख्यमंत्री यांचं मत आहे. पण मी मुख्यमंत्री होण्यासाठीच निवडणूक लढविणार आहे असे आठवले यावेळी म्हणाले. सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर निवडुन येतील असे मला वाटत नाही असेही ते म्हणाले. वंचित आघाडी ही शिवसेना आणि भाजपाला निवडून आणणारी आघाडी असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. बसपाला चांगले चॅलेंज द्यायचे असेल तर उत्तरप्रदेशात मला काही जागा मिळावेत अशी मागणी मी आदित्यनाथ यांच्याकडे केल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या निवडणूक माघार घेतल्या प्रकरणीही आपली प्रतिक्रिया दिली. सगळ्या परिस्थितितीचा अंदाज आल्याने शरद पवार यांनी निवडणूकीतून माघार घेतली असे आठवले म्हणाले. एकूण सगळी परिस्थिती पहाता पंतप्रधान होता येत नाही; हे शरद पवारांना कळाल असेल त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला असे आठवले यांनी यावेळी सांगितले.