बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मूळ गावी म्हणजे काटेवाडीत शेतकरी भयभयीत आहे. काटेवाडीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या तीन महिन्यात तीन बिबटे पकडण्यात आले आहेत.
एवढंच नव्हे तर या शिवारात आणखी बिबटे असल्याचं देखील शेतकऱ्यांच मत आहे. पवारांच्या काटेवाडीत बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडीत आज तिसरा बिबट्या पकडण्यात आला आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी ही दोन बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले होते. डिसेंबर २०१९ पासून हे बिबटे या परिसरात वावरत असल्याचे शेतकऱ्यांच म्हणणं आहे. तर या तीन बिबट्या व्यतीरिक्त आणखी या बिबट्याची पिल्ले असल्याचं शेतकरी सांगत आहेत. या बिबट्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण दिसत आहे.
बारामती नजीक असलेल्या एका कंपनीमध्ये बिबट्या वावरत असणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच काटेवाडी-कन्हेरी जवळील ओढ्यालगत चरणाऱ्या मेंढ्याच्या कळपावरती बिबट्याने हल्ला करुन मेंढीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. बिबट्या बारामती शहरानजीक असल्यामुळे शहरासह तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिन्यात बिबट्याने काटेवाडी येथील एका शेतात कुत्र्याचा फडशा पाडला होता.
दरम्यान, काटेवाडीजवळील धनेवस्ती येथील विजय काटे यांच्या शेतात मेंढ्या चरत असताना एका बिबट्याने कळपावर हल्ला केला. एका मेंढीला बिबट्याने मानेला जबड्यात धरुन फरपटत नेली. यामुळे इतर मेंढ्या भांबावल्या. हा प्रकार लक्षात आल्याने काळे यांनी धाडसीपणाने बिबट्याचा पाठलाग केला.