सातारा : मराठा आरक्षण स्थगितीबाबत मराठा समाज म्हणून जी भूमिका घेतली जाईल त्याबाबत आपण समाजाबरोबर राहू आणि वेळ पडली तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागले तरी त्यासाठी तयार असल्याची थेट भूमिका साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून बाजू योग्य पद्धतीने मांडली गेली नाही आणि त्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. सर्वोच्य न्यायालयाकडून मराठा समाजाच्या आरक्षणाला जी स्थगिती देण्यात आली याबाबत समाज म्हणून जी भूमिका घेतली जाईल त्याबाबत मी समाजाबरोबर राहणार आणि वेळ पडली तर आंदोलनात सहभागी होईन, असे ते म्हणाले.
दरम्यान, संभाजीराजे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल.
आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. pic.twitter.com/89HOaJHi9f
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 9, 2020
आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटले आहे.
मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल.
यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल.— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 9, 2020
या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अपेक्षा आहे.