आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातली असती- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray:  शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 12, 2024, 09:13 PM IST
आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातली असती- उद्धव ठाकरे title=
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातलीच असती. असे हे महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचेच नाहीत,असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाच्या अनुशंगाने ते बोलत होते. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. 

आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातलीच असती

शिंदेला गोळी घातली. शिंदेला गोळ्या घालायलाच हव्या होत्या. आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातलीच असती. असा हा नराधम असे हे महिलांवर अत्याचार करतो. आईवर अत्याचार करतो. शिंदेला गोळी घातली याचं दुख नाही. म्हातारी मेल्याच दुख नाही पण काळ सोकावतोय. शिंदे जगायच्या लायकीचेच नाहीत.असा हा नराधम अत्याचार करतो. अक्षय शिंदेला गोळी घातली याचं दु:ख नाही. बाकीचे सगळे होते. तो पुरावा नष्ट करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळी घातली असेल तर त्याचाही उलगडा झाला पाहिजे.

3 सरन्यायाधीश आपल्या कारकिर्दीत लोकशाहीला न्याय देऊ शकले नाहीत. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. तिला समोर कोण आहे दिसत नसतं. आक्रोश तिच्या कानावर पडत असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अद्यापही सुनावणी झाली नाही. याप्रकरणी तारखांवर तारखा मिळत आहेत. कोणत्याही क्षणी निवडणूका जाहीर होऊ शकतात. यानंतर न्याय मिळाला तरी तो काय उपयोगाचा, असा उल्लेख सुषमा अंधारे यांनीदेखील आपल्या भाषणात केला होता. शेवटचा श्वास असेपर्यंत मी शाहु फुलेंचा महाराष्ट्र मोदी शहांचा होऊ देणार नाही, असे ठाकरे  म्हणाले. 

उद्धव ठाकरेंनी दिली शपथ 

मी एक स्वाभीमानी महाराष्ट्रप्रेमी म्हणून शपथ घेतो की, 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळालेला महाराष्ट्र मी लुटारु, दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाची एकजुट केली ती मी अभेद्य ठेवेन. मी शपध घेतो की शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत महाराष्ट्र बनवण्यासाठी हीच मशाल धगधगत ठेवेन.

ही शिवसेना नाही तर ही वाघनखं आहेत,जी बाळासाहेबांनी मला दिली आहेत.  येवू देत त्यांच्या कितीही पिढ्या,गाढून टाकू त्यांना.  टाटांसारखे उद्योगपती वेगळे असतात. आताचे उद्योगपती मिठागरे गिळतायत. मिठागरे गिळणार का जात नाहीत.जे जायला हवेत ते जात नाहीत.  कौरव माजले होते...शकुनीमामा कोण तुम्हाला माहिती आहे. भाजपला आम्ही खांद्यावर घेवून फिरवले..आता भाजपला आम्हाला खांदा द्यायचा आहे. आपल्यासमोरचा तो शत्रू..त्याला ठेचावाच लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संघाने चिंतन शिबीर घ्यावे आणि आत्ताचा जो भाजप आहे तो संघाच्या विचारसरणीवर चालतोय हे शोधल पाहिजे. गद्दांरांना एकत्र राज्य करत आहेत. हिंदूत्व म्हणजे काय? गाईला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. पण महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती?  आधी आईला वाचवा मग गाईला वाचवा. राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे. महिलांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उद्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

जोपर्यंत अदाणींचं सगळे काम होत नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नसल्याचं असं मला एका अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे म्हणालेत... अनेक प्रकल्प मित्रांना वाटप करणं सुरूये . ते थांबवण्यासाठी आपल्याचा एकजूट दाखवायची असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात म्हटलंय..