धक्कादायक ! कोरोनाची लस घेतल्यानंतर २० ते २५ जणांना कोरोना

 लस दिल्यावर २० ते २५ कर्मचा-यांना कोरोना 

Updated: Feb 10, 2021, 04:37 PM IST
धक्कादायक ! कोरोनाची लस घेतल्यानंतर २० ते २५ जणांना कोरोना title=

अनिरुद्ध ढवाळे, अमरावती : कोरोना घेतलेल्या २० ते २५ जणांना कोरोना झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तर २१४ जणांना लसीची रिअॅक्शन झाली आहे. त्यांना अंगदुखी आणि उलट्यांचा त्रास होतो आहे. लस घेतलेल्या माजी मंत्र्यांनाही कोरोना झाला आहे.

१६ जानेवारीपासून इथे कोरोना लसीकरण सुरू झालं. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. लस दिल्यावर २० ते २५ कर्मचा-यांना कोरोना झाला आहे. तर २१४ लोकांना लसीची रिअॅक्शन झाली आहे. आरोग्यमंत्र्यांनी मात्र याबद्दल विशेष माहिती नसल्याचं सांगितलंय.

राज्याचे माजी कृषीमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनाही कोरोनाची लस घेतली होती. पण त्यांनाही कोरोना झाला आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यासाठी जवळपास तीस दिवस लागतात. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही खबरदारी घेण्याची गरज आहे.

पुढच्य़ा काही काळात सर्वसामान्यांनाही कोरोनाची लस दिली जाईल. मात्र लस घेतली की आपल्या जवळ कोरोना फिरकणारच नाही, असं समजून गाफील राहू नका. लस घेतली तरी काळजी घ्या.