लैलेश बारगजे, अहमदनगर, झी मीडिया : देशात आणि देशाबाहेरील भाविकांची श्रद्धा असलेल्या अहमदनगर येथील शनिशिंगणापूर मंदिरात प्रवेश करण्यासाठी आज पासून भुयारी मार्ग खुला करण्यात आला आहे. या भुयारी मार्गामुळे मंदिरा बाहेर असलेल्या वाहतुकीच्या रस्त्याचा अडथळा भाविकांना होणार नाही. देवस्थानच्या वाहन तळातून मंदिराच्या दरवाजापर्यंत भाविकांना हा भुयारी मार्ग घेऊन जाणार आहे.
रोज हजारो भाविक शनी दर्शनासाठी शिंगणापूर येथे येत असतात. या भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी गावातून जाणाऱ्या वाहतुकीच्या रस्त्यातून मंदिरात प्रवेश करावा लागत असे वाहतुकीच्या रहदारी आणि भाविकांची गर्दी यामुळे मंदिर करताना वाहतूक कोंडी होत असे आणि भाविकांना अस सुविधा निर्माण होत असत वाहन तळापासून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत साधारण अडीचशे मीटरचा भुयारी मार्ग भाविकांसाठी खुला केल्याने वाहतूक कोंडी वर मात झाली असून आणि भाविकांसाठी सुविधा निर्माण झाली आहे.
शनी मंदिर देवस्थान कडून मंदिराच्या परिसरातच मोठे वाहन निर्माण करण्यात आले आहे. या वाहन तळातूनच भुयारी मार्ग सुरू होतो या वाहन तळाच्या परिसरातच भाविकांसाठी शनीदेवाला अर्पण करण्यासाठी लागणारे तेल, पूजा साहित्याची दुकान आहेत. मोठे प्रशस्त वाहन तळ आणि तिथेच या पूजा वस्तूची सुविधा असल्यामुळे भाविकांना मंदिर परिसरातच इकडे तिकडे फिरण्याची आवश्यकता लागणार नाही आणि पूजा साहित्य खरेदी करून दर्शनासाठी गर्दी नसलेल्या भुयारी मार्गाने मंदिरात प्रवेश करता येणार आहे.
शनी मंदिरासमोरच पानसनाला ही नदी आहे. याच नदीपात्रामध्ये शनी मंदिरात असलेली शिळा सापडलेली आहे. त्यामुळे पानसनाला तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत 55 कोटींची कामे काही वर्षांपासून सुरू आहेत याच विकास प्रकल्प अंतर्गत वाहन तळापासून शनी मंदिर द्वाराकडे घेऊन जाणारा भुयारी मार्ग देखील आहे. या सोबतच पानसनाला सुशोभीकरणाचा देखील काम या प्रकल्पा अंतर्गत केलं जात आहे. विकास कामांतर्गत सुरू असलेल्या कामाचा मोठा टप्पा म्हणजे शनी मंदिर द्वारापर्यंत येणारा हा भुयारी मार्ग असून हा पूर्ण झाला असून तो भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. यासोबतच विकास प्रकल्प अंतर्गत मंदिर परिसरामध्ये 75 फूट उंचीचा स्तंभ साकारण्यात आला आहे. याबरोबरच नवग्रह मंदिर, उद्यान भाविकांसाठी सेल्फी पॉईंट अशी वेगवेगळी कामे प्रगतीपथावर आहेत.