Maharashtra Terrorist Attack News : महाराष्ट्र दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. महाराष्ट्रात (Maharashtra ) घातपाताचा कट (Terrorist Attack) रचला जात असल्याची कबुली आंबिवलीत अटक झालेल्या दहशतवाद्यांनी दिली आहे. (Maharashtra News in Marathi) आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह संधू उर्फ रिंदाच्या दहशतवादी मॉड्युलच्या आधारे हा कट रचला जात होता. (Terrorist Attack : Harvinder Singh Sandhu preparing to attack in Maharashtra) दुसरीकडे, मुंबईमधील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
रिंदाच्या मृत्यूनंतर त्याची गँग कुख्यात गँगस्टर सोनू खत्रीने हाती घेतलीय. याच सोनूच्या इशाऱ्यावर राज्यात मोठा घातपात घडवण्याचा कट होता. हा घातपात केव्हा, कसा कधी आणि कुठे होणार हे मात्र अजून या दहशतवाद्यांनाही माहिती नव्हते. पण या ऑपरेशनसाठी येत्या काही दिवसांत त्यांना आदेश मिळणार होते. कल्याण जवळील आंबिवलीत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि पंजाब एटीएसने कुख्यात दहशतवाद्यांना अटक केली. त्यातून ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पोलीस अधिक सर्तक झाले आहेत.
दरम्यान, मुंबईमधील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. कोणी अज्ञात कॉलद्वारे ही धमकी देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजता सुमारास शाळेच्या लँडलाईनवर एक फोन आला. फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर कॉल लगेच डिस्कनेक्ट झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. धमकी देणाऱ्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, या धमकीनंतर सावधगिरी बाळण्यात येत आहे.
मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) घडवण्याची धमकी देण्यात आलीय. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला यासंबंधी एक धमकीचा फोन आला होता. (Mumbai terror attack News) मुंबईत माहीम, भेंडी बाजार, नागपाडा, मदनपुरा परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी या कॉलद्वारे देण्यात आली. याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला मुंबई एटीएसनं ताब्यात घेतले आहे. (Mumbai Bomb Blast ATS Threat call )
दरम्यान, राजधानी नवी दिल्लीमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हल्ल्याचा कट रचला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कमी वयाच्या मुलांकडून हा हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. गुप्तहेर संस्थेला यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी माहिती दिली असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत.