शिर्डी विमानतळाची चाचणी, १ ऑक्टोबरला शुभारंभ

 शिर्डी विमानतळाची चाचणी घेतली गेली. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ‘अलायन्स एअर लाइन्स’च्या विमानानं मुंबई विमानतळावरून शिर्डीसाठी उड्डाण केलं. अवघ्या चाळीस मिनिटांत हे विमान शिर्डी विमानतळावर उतरलं.

Updated: Sep 26, 2017, 05:17 PM IST
शिर्डी विमानतळाची चाचणी, १ ऑक्टोबरला शुभारंभ  title=

शिर्डी : शिर्डी विमानतळाची चाचणी घेतली गेली. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ‘अलायन्स एअर लाइन्स’च्या विमानानं मुंबई विमानतळावरून शिर्डीसाठी उड्डाण केलं. अवघ्या चाळीस मिनिटांत हे विमान शिर्डी विमानतळावर उतरलं.

तंत्रज्ञ, सुरक्षा आणि अधिकारी यांचे पथक शिर्डीचा रन-वे टेकऑफ आणि लँडिंगसाठी योग्य आहे का याची चाचणी घेण्यात आली. या विमानातून राज शिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी प्रवास केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ ऑक्टोबरला शिर्डी विमानतळावर प्रवासी वाहतुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.