CCTV Accident Video: जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताची शृंखला थांबता थांबेना. मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात सिंधुदुर्गजवळील ओरोस पीठजवळील नदीच्या पुलाजवळ झाला आहे. (trending video mumbai goa highway accident caught in cctv watch video in maratha)
राज्यात रविवारपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुंबई - गोवा महामार्गावरही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे महामार्ग पावसाच्या पाण्यामुळे ओले आहेत. अशात एक कार भरधाव वेगाने येत आहे. काही वेळानंतर कारचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे आणि त्यात रस्त्यावर असलेल्या पाण्यामुळे गाडी नियंत्रण करणे गाडीचालकाला कठीण जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महामार्गावर या कारशिवाय एक बाइकचालक आणि ऑटोरिक्षा पण दिसत आहे. ज्या भरधाव वेगाने गाडी आली त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या इतर लोकांचे जीव धोक्यात होते. तुम्ही पाहू शकता जेव्हा या गाडीवरील नियंत्रण सुटलं त्या रस्त्यावरुन एक बाइक चालक जात होता. या गाडीचा वेग पाहून काही क्षणासाठी होती बिथरला. जरा विचार करा ऑटो रिक्षा चालक, प्रवासी आणि बाइक चालक यांचा या अपघातात काय झालं असतं. नशीबाने या दुर्घटनेत ही गाडी महामार्गावरील रेलिंगला जाऊन आदळली. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही.