Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वीकेंडनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेताना भाविकांना फक्त काही क्षण मिळतात. नंतर तेथील सुरक्षा रक्षक त्यांना मुजोरीन ढकलून देतात. वयोवृद्ध आई-वडिलांना अशा ढकलण्यावरून आक्षेप घेणाऱ्या नाशिकच्या एका वकिलाला सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तर, या प्रकरणात तब्बल सात तासांनंतर पोलिसांत तक्रार दाखल करुन घेतली आहे.
सलग तीन दिवस सुट्टी आल्याने रविवारी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरा बाहेर गर्दी होती. महेंद्र सूर्यवंशीहे देखील त्यांच्या आई-वडिलांसह दर्शनासाठी गेले होते. मात्र, दर्शन करत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर जाण्याची घाई केली. त्यावेळी महेंद्र यांची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली. सुरक्षारक्षकांची भाविकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच,त्यांच्या वयोवृद्ध आईला ढकलून दिल्याने पायऱ्यांवरून खाली कोसळत त्या जखमी झाल्या आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणी या भाविकांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यामध्ये तीन तास बसूनही पोलिसांनी तक्रार घेतली नाही. तसंच, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही .अखेर घटना घडल्यानंतर आमदारांनी दूरध्वनी केल्याने सात तासांनी केवळ एनसी दाखल करण्यात आली आहे. सलग तीन दिवस सुट्टी आल्याने रविवारी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरा बाहेर गर्दी होती. चार ते पाच किलोमीटरच्या रांगामध्ये तीन ते चार तास प्रतीक्षा करणाऱ्या भाविकांची होणारी उपेक्षा आता थांबवण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य उपस्थित करत आहेत.