सैफच्या हल्लेखोराप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, 2 महिन्यांपूर्वी नाहूरमध्ये लोकांनी पकडून पोलिसात दिले पण...

Saif Ali Khan attacker: पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम वेगाने सुरू आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jan 18, 2025, 01:58 PM IST
सैफच्या हल्लेखोराप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, 2 महिन्यांपूर्वी नाहूरमध्ये लोकांनी पकडून पोलिसात दिले पण... title=
सैफ अली खान हल्लेखोर

Saif Ali Khan attacker: सैफ अली खान याच्या घरी घूसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा मुंबई पोलिस तपास करत आहेत. सैफवर हल्ला केल्याच्या नंतर तो दादर येथील एका दुकानात इयरफोन घेताना दिसला होता. यानंतर तो लोकलमार्गे वसई, विरारच्या दिशेने पळाल्याचे सांगितले जात आहे. आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम वेगाने सुरू आहे. सैफवर चाकूचे वार करणारा हल्लेखोर कोणी साधासुधा चोर नाहीय. तर तर तो सराईत गुन्हेगार आहे. सैफच्या बिल्डींगमधील सीसीटीव्ही मध्ये दिसणारा आरोपी सराईत चोर असल्याची माहीती समोर येतेय. कारण याच सीसीटीव्ही मधील आरोपीला 2 नोव्हेंबर 2024 च्या रात्री नाहूरमधील ॲशफोर्ड सोसायटीत चोरी करताना सापडला होता. त्यावेळी सोसायटीतील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते, अशी माहिती आता समोर आलीय.

यानंतर भांडुप पोलिसांनी या सराईत चोराला अटकदेखील केली होती. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याला सोडून दिले होते. या संदर्भात ॲशफोर्ड सोसायटीतील जागरूक नागरिकांनी एका राजकीय नेत्याकडे ही सर्व माहीती दिली. त्यानंतर त्या राजकीय नेत्याने ही सर्व माहीती वांद्रे वरीष्ठ पोलिसांना दिल्याचे वृत्त समोर येत आहे. 

सैफच्या बिल्डींगमधील सीसीटीव्ही, दादर स्थानकाजवळील दुकानाचे सीसीटीव्ही, रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीच्या मदतीने आता पोलीस वेगाने तपास करत आहेत. समोर आलेल्या माहीतीवरून आरोपीला अटक होणार असल्याची माहीती मिळतेय.