चंद्रपूर : आरक्षित भूखंडांवर बांधलेलं बांधकाम गुंठेवारी अधिनियमात बसत नसल्याने चंद्रपूर महापालिकेने तब्बल दोन हजारांवर बांधकामांना अनधिकृत ठरवले आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका घरांना बसलाय.
ही बांधकामं म्हणजे लोकांनी बांधलेली घरं आहेत. त्यामुळं अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आता कोणत्याही शासकीय विकासाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे धास्तावली आहेत.
गुंठेवारी अधिनियमानुसार ही बांधकामं नियमित करावी, यासाठी लोकांनी केलेले प्रस्ताव महापालिकेनं फेटाळले आहेत. केवळ ३८१ प्रस्ताव यात योग्य ठरवण्यात आले आहेत. महापालिकेच्या या भूमिकेमुळे नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे.