Water Taxi Services: नवी मुंबई विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport - NMIA) उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. एप्रिल 2025 अखेरीस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या विमानसेवा सुरु होणार आहे. मार्च 2025 अखेरीस देशांतर्गत वाहतूक सुरु होणार तर एप्रिला 2025 अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमातळापर्यंत पोहचण्यासाठी रेल्वे, भुयारी मेट्रो, अटल सेतू, एक्स्प्रेस वे यासारखे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मात्र, यापेक्षा जबरदस्त प्लान तयार केला जाणार आहे. या प्लाननुसार मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील एकमेव विमानतळ आहे. या विमातळावर वाहतुकीचा मोठा ताण येत आहे. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईच्या विमानतलावरीव ताण कमी होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे (Navi Mumbai International Airport - NMIA) भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे विमानतळ ठरणार आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात.
प्रवाशांना जलद गतीने नवी मुंबई विमानतळावर पोहचता यावे यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय निर्माण केले जात आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वॉटर टॅक्सीचा प्रस्ताव मांडला आहे. वॉटर टॅक्सीच्या माध्यमातुन मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येईल असे गडकरी म्हणाले.
मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सरकारने वॉटर टॅक्सीची योजना तयार केली आहे. या योजनेअंतगर्त नवी मुंबई विमानतळाजवळ नेरुळ, बेलापूर तसेच उरण परिसरात जेट्टी बांधण्यात आला आहे. मुंबईतून वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून अगदी जलद गतीने नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे.