मुंबई : ध्वनीप्रदूषणाची सुनावणी करणा-या नव्या खंडपीठात न्यायमूर्ती अभय ओक यांचाही समावेश करण्यात आला आहे. ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे उद्या ध्वनी प्रदुषण याचिकेवर ही सुनावणी घेतली जाणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मुंबई उच्च न्यायालय आमनेसामने आले होते. ध्वनी प्रदुषणाबाबत न्यायमूर्ती अभय ओक पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप राज्य सरकारनं केला होता. फक्त आरोप करुनच राज्य सरकार थांबलं नव्हतं, तर हे प्रकरण इतर खंडपीठाकडे नेण्याकरता राज्य सरकारनं मुख्य न्यायाधिशांकडे अर्जही केला होता.