मुंबई : अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाडीची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये युवासेना जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा प्रकार झाला. याबाबत मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मंचाजवळ जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केल्याचे मानसीने या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण माझ्यापर्यंत होते तोपर्यंत मी काहीही बोलले नाही. मात्र, माझ्या आईला धमकविण्याचा प्रयत्न झाला आहे. आज महिलांबाबत अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनी पुढे आले पाहिजे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे. मी घाबरणार नाही, मी गप्प बसणार नाही, असे तिने तक्रार दाखल केल्यानंतर स्पष्ट केले.
#BreakingNews । अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाडीची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये युवासेना जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा प्रकार झाला. याबाबत मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. https://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/VHmVl4f7tY
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 7, 2020
वर्ध्यातील हिंगणघाट घटनेनंतर महिलांविरोधात अनेक गुन्हे घडतच आहेत. मुंबईत माटुंगा रेल्वे स्थानकात एका विकृत युवकाने दोन महिलांची छेड काढली. यात एका तरुणीचा चुंबन घेत विनयभंगही केला. औरंगाबादमध्ये सिल्लोड येथे महिलेला जीवंत जाळण्यात आले. तर पुणे कोरगावमध्ये एका महिलेला आपल्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकावण्यात आले आहे. आता तर अभिनेत्री मानसी नाईक हिलाही धमकविण्यात आले आहे. रांजणगाव येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात मानसीची छेडछाड काढल्याची घटना पुढे आली आहे. तिने याबाबत रितसर तक्रारही दिली आहे. साकीनाका पोलिसांनी हे प्रकरण रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केलंय. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली आहे.