मुंबई : स्वच्छ अभियान राबवणाऱ्या मंत्रालयालाच मुंबई महापालिकेनं १० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यानं हा दंड ठोठावण्यात आलाय.
मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या रहिवाशी सोसायट्या, व्यावसायिक इमारती, कार्यालयं आणि हॉटेल्सनं ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करुन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी असे आदेश महापालिकेनं काढले होते.
मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही मंत्रालयातून काहीच हालचाली न झाल्यानं अखेर हा १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.