मुंबई : राज्य सरकारने नवे उद्योग धोरण मंजूर करून घेण्यासाठी दलाली केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांच्या दावोस दौऱ्याचा खर्च ७ कोटी दाखवून लाचखोरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचा खर्च १ कोटी होता. मग सचिवांना ७ कोटी का लागले, असा त्यांचा सवाल आहे.
१ ते २५ जानेवारीदरम्यान हा दौरा झाला असताना सर्व बिले २१ तारखेचीच असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. उद्योग धोरण मंजूर करून घेण्यासाठी ही रक्कम लाच म्हणून दिली गेल्याचा आरोप करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मलिक यांचे आरोप फेटाळले आहेत.