मुंबई : तासाभराच्या गोंधळानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये सुरु आहे. किमान समान कार्यक्रमावर बैठकीत खल सुरु आहेत. दरम्यान, सिल्वर ओकवरील बैठकीला अजित पवार बैठकीला उपस्थित असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. अजित पवार नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, सरकार शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली बनेल, हॉटेलमधील गुप्त भेटीत अहमद पटेलांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन दिल्याची माहीती आहे. मात्र, आठवडाभर थांबण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक होणार की नाही यावरून अजित पवारांच्या विधानामुळे तब्बल तासभर नुसता गोंधळ उडाला. पवारांच्या घरातून निघतना अजित पवारांनी बैठक होणार नसल्याची गंमत केली, आणि मग आघाडीच्या नेत्यांची नुसती तारांबळ उडाली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले. काहींनी ही गम्मत होती असे सांगण्यात आले. तर काहींनी थट्टा केल्याचे म्हटले. दरम्यान, काँग्रेसकडूनही या गोंधळात भर टाकला. त्यांच्याकडून निरोप येणार होता. तसा निरोप आलेला नाही. चर्चा सुरु आहे. उद्याही चर्चा सुरु होईल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणालेत. त्यामुळे अधिक गोंधळात भर पडली. दरम्यान, शरद पवार यांनीही असे काहीही झालेले नाही. ते नाराज नाहीत. ते बैठकीला आहेत. त्यांनी थट्टा केली असेल, असे सांगितले.
आघाडीच्या समन्वय समितीची वांद्र्याच्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये सुरू आहे. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक हे सर्वजण या बैठकीला उपस्थित आहेत.