Thackeray Group's Shiv Sena : 'धनुष्यबाणा'साठी (Dhanushyaban) ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरुद्ध ठाकरे गट याचिका दाखल करणार आहे. ( Maharashtra Political News) त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालय त्यांची याचिका दाखल करुन घेणार का, याची उत्सुकता आहे. याआधी ठाकरे गटाची याचिका सिंगल बेंचनं फेटाळली होती.
मूळ शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले होते. शिंदे गटाने धनुष्यबाणावर दावा केला. त्यानंतर नवा पेच निर्माण झाला. ठाकरे आणि शिंदे गटाकडून धनुष्यबाणावर दावा करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यवाण हे चिन्ह गोठवले. हे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली होती. याआधी सिंगल बेंचनं ठाकरे गटाची याचिका फेटाळली होती. आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढं पुन्हा अपील करणार आहेत. ( हेही वाचा - ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज एसीबीसमोर राहणार हजर )
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी शिवसेना या पक्षनावावर आणि धनुष्यबाण या निशाणीवर दावा केला होता. दोन्ही गटांनी सादर केलेल्या लेखी निवेदन आणि पुराव्याच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी राजकीय पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या हंगामी निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली होती. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णयाविरोधात आव्हान दिलं होतं. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच निवडणूक आयोगाला यासंबंधी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिलो होते. हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारकक्षेत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
दरम्यान, मी पक्षप्रमुख आहे, मी 30 वर्षे पक्ष चालवलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण गोठवण्याचा घेतलेला निर्णय केवळ प्रथमदर्शनी समोर आलेल्या मुद्यांच्या आधारे घेतलेला आहे. हा आधार समाधानकारक असू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग राजकीय पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवू शकत नाही. आयोगाच्या निर्णयामुळे माझ्या वडिलांनी निश्चित केलेले पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा मला वापर करता येत नाही, असा युक्तिवाद शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्यावतीने याआधी करण्यात आला होता.