मुंबई : 100 कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली आहे. रात्री उशिरा अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. बारा तासाहून अधिक काळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरूच होती.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. जवळपास पावणे बारा वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर ईडीने देशमुखांना अटक केली आहे. ही चौकशी बराच काळ लांबली आणि रात्री उशिरा ईडीने कारवाई केली आहे.
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrested in connection with extortion and money laundering allegations against him: ED officials
(file photo) pic.twitter.com/uVLEBNk8kL
— ANI (@ANI) November 1, 2021
महत्वाची बाब म्हणजे ईडीचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीहून मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल झाली आहे. अटकेपूर्वी अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचेही वृत्त आहे. या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सर्व आरोपींचे जबाबही देशमुख यांच्यासमोर ठेवण्यात आले. मात्र देशमुख यांनी कोणत्याही प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देता आले नाही. ते फक्त आरोप फेटाळत राहिले. पण तपासाच्या आधारे ईडीने त्याला अटक केली.
We cooperated in the investigation related to a case involving Rs 4.5 crores...We will oppose his remand when he is produced before the court, today: Inderpal Singh, lawyer of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh in Mumbai pic.twitter.com/xgfLxWV0E3
— ANI (@ANI) November 1, 2021
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर मुंबईतील कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत पब, बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यानंतर या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली. याप्रकरणी अनिल देशमुख यांचे सहाय्यक (पीए) कुंदन शिंदे आणि खासगी सचिव (पीएस) संजीव पालांडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. देशमुख यांनाही अटक होण्याची भीती होती. अखेर रात्री उशिरा अनिल देशमुखांना अटक केली आहे.