HPCL Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मध्ये बंपर भरती सुरु आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार ते 2 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये एकूण 312 रिक्त पदे भरले जाणार आहेत. यांत्रिक अभियंताची 57, विद्युत अभियंताची 16, इन्स्ट्रुमेंटेशन अभियंताची 36, स्थापत्य अभियंताची 18, रासायनिक अभियंताची 43,वरिष्ठ अधिकारी – शहर गॅस वितरण संचालन आणि देखभालची 10, वरिष्ठ अधिकारी एलएनजी व्यवसायची 2,वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – जैवइंधन प्लांट ऑपरेशन्स आणि वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – CBG प्लांट ऑपरेशन्स चे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहे.
वरिष्ठ अधिकारी – विक्री (किरकोळ/ ल्युब्स/ थेट विक्री/ एलपीजी) ची 30, वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – गैर-इंधन व्यवसायची 4, वरिष्ठ अधिकारी – ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय आणिअग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी – मुंबई रिफायनरीची प्रत्येकी 2 पदे, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी – विशाख रिफायनरीची 6 पदे, गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी – 09
चार्टर्ड अकाउंटंटची 16, कायदा अधिकारीची 5, कायदा अधिकारची 2, वैद्यकीय अधिकारीची 4, माहिती प्रणाली (IS) अधिकारीची 10 आणि महाव्यवस्थापक (O/o कंपनी सचिव आणि कल्याण अधिकारी – मुंबई रिफायनरीचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहे.
या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1,180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. मागासवर्गीय उमेदवारांना यातून सवलत देण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50,000 ते 2 लाख 80,000 पर्यंत पगार दिला जाणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ग्रुप टास्क, पर्सनल इंटरव्ह्यू या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
18 सप्टेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
अर्जाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत ही भरती केली जाणार आहे. यासाठी 29 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.