ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाकाळात गरीबांचे अनेक हाल होऊ लागलेत. मुलभूत गरजांसाठी त्यांना झगडाव लागत आहे. असं असताना कोरोनाच्या या कठीण काळात गोरगरिबांपर्यंत अन्न आणि मदत पोहचवण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. यामध्येच 'लिव्ह टू गिव्ह' या जागतिक संस्थेला मुंबई पालिका तसंच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची साथ मिळाली आहे. या संस्थेतून गरिबांना अन्न, तसंच रुग्णांना प्लाझ्मा, ऑक्सिजन ची देखील मदत केली गेली आहे.
या संस्थेला विविध स्तरातुन डोनेशन मिळत असून ही संस्था ग्राउंड लेव्हल वर जाऊन मदत पोहचवण्याचं काम करत आहे. लिव्ह टू गिव्ह संस्थेचे संस्थापक मरझी पारीख यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. 'लिव्ह टू गिव्ह' ही संपूर्ण देशभरात काम करणारी संस्था आहे. मग कोरोना च नाही तर त्याआधीपासून या संस्थेतर्फे अनेकांना मदत पोहचली आहे. व्हाट्सएप ग्रुप मधून ही संस्था अनेकांशी जोडली गेली आहे. यामधून त्यांना डोनेशन मिळत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदतही पोहचत आहे. याचा आढावा घेतलाय प्रतिनीधी ऋचा वझे यांनी.