Maharashtra Politics : पार्थ पवार... (Parth Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवारांचे (Ajit Pawar) चिरंजीव आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) नातू. पार्थ पवार यांनी उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंची (Shambhuraj Desai) भेट काय घेतली, राजकारणात खळबळ उडालीय.. काही खासगी कामासाठी ही भेट असल्याचं सांगितलं जातंय. (Parth Pawar Meet Minister Shambhuraj Desai)
मात्र पार्थ पवार राष्ट्रवादीत (NCP) अस्वस्थ असल्याचा दावा भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलाय. एवढंच नाही तर त्यांच्यावर राष्ट्रवादीत कसा अन्याय होतोय, याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. पार्थ पवार यांच्या मनात अस्वस्थता आहे, कारण त्यांचे दुसरे बंधू दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विधानसभा सदस्य झाले, शिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही झाले, त्यामुळे पार्थ पवार यांनाही वाटत असेल की आपल्यावर घरातच अन्याय होतोय, आजोबांकडून अन्याय होत असेल, त्यामुळे न्याय मिळवण्याच त्यांचा प्रयत्न असेल, असं पडळकर यांनी म्हटलं.
दरम्यान, हा सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार आणि पार्थ यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आमच्या घराबद्दल बोलल्याशिवाय बातमी होत नाही, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, पार्थ पवार यांच्यामुळं याआधीही पवार कुटुंबातील वादांची चर्चा सुरू झाली होती.
पार्थ पवारांमुळे कुटुंबात वाद?
2019 मध्ये मावळमधून त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली
त्यांच्या उमेदवारीवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती
पार्थ पवार मावळमधून उभे राहिल्यानं शरद पवारांनी माढामधून माघार घेतली
त्या निवडणुकीत पार्थ पवारांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला
याउलट शरद पवारांच्या सांगण्यावरून रोहित पवारांनी जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवली
ते आमदार झाले आणि आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही झालेत
पार्थऐवजी रोहित पवारांना आजोबा झुकतं माप देत असल्याचं बोललं जातं
त्यामुळंच पार्थ पवारांवर राष्ट्रवादीत अन्याय होत असल्याची चर्चा सुरू झालीय... ही चर्चा किती खरी आणि किती खोटी, पडद्यामागं नेमकं काय घडतंय, हे येणारा काळच ठरवेल.