मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना विषाणु संसर्गामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातला कोणताही स्थलांतरित मजूर तसेच गरीब भुकेलेला राहणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेईल ,अशी ग्वाही, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांनी काल मुंबईत भायखळ्यातल्या रिचर्डसन क्रुडास कंपनीच्या आवारात उभारलेल्या निवारा छावण्यांना भेट देऊन स्थलांतरित मजुरांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस करत त्यांना अन्नधान्याचं वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते.
रिचर्डसन कृडास चर्या आवारात बेघरांना अन्न वाटण्याचं भाग्य लाभलं. @OfficeofUT ने सांगितल्याप्रमाणे राज्यातील कुणीही कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे उपाशी राहणार नाही याची काळजी सरकार अशीच घेईल. pic.twitter.com/DCKqASy5KK
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 31, 2020
आजची आपली भेट म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात व्यक्त केलेल्या सरकारच्या बांधिलकीचाच एक भाग आहे असही ते म्हमालेत. राज्यात सध्या असलेले आदिवासी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, गरीब, हे कुठल्या राज्यातले आहेत याचा विचार न करता, सरकार त्यांचे हाल होऊ देणार नाही, त्यादृष्टीने अशा सर्व जणांची माहिती घेण्यात येत आहे. त्यांना तात्काळ मदत करावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
आपण घरात कुटुंबियांची काळजी घेत २ महिन्यांचा किराणा घेण्यात व्यस्त होता, तेव्हा पोलीसच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्त्यावर पहारा देत होते. कोरोनाची भीती त्यांना वाटत नसेल का ? त्यांना वाटत नसेल का घरी जाऊन आपणही इतरांप्रमाणे मुलांसह खेळावं?
शेवटी पोलीस पण माणूस आहे. pic.twitter.com/FjjTLIWBeH— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 31, 2020
SP. नागपूर ग्रामीण #राकेश_ओला
यांनी मध्यप्रदेश सीमेवरील कामगार मजुरांच्या केळवद कॅम्पला भेट देऊन प्रशासन आपल्या सोबत असल्याबाबत आश्वस्त केले व त्याच ठिकानी थांबण्याची सूचना दिल्या.@rakesh_ola @DGPMaharashtra @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @AdlCPCrimeMum pic.twitter.com/DKNaz646cN— Nagpur Rural Police (@SPNagpurrural) March 30, 2020
गडचिरोली पोलीस दलाकडून गरजू व्यक्तींना नास्ता व भोजनाची सोय @DGPMaharashtra @InfoGadchiroli @DM_GADCHIROLI @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/j815uUhiuK
— GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) March 30, 2020