MMRCL Recruitment 2024: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड वेळोवेळी नोकर भरती जाहीर केली जाते. नुकतीच येथे पुन्हा भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून मुंबई मेट्रोमध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर याचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई मेट्रोमध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणजेच चीफ विजिलन्स ऑफिसरचे पद भरले जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मुख्य दक्षता अधिकारीचे 1 पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संघटित ग्रुप ए आणि सिनिअर अॅडमिनिस्ट्रेशन ग्रेड (SAG) चा पे स्केल असावा. रेल्वेतील ग्रुप ए इंजिनीअरिंग टेक्निलमध्ये कामाचा अनुभव असेल तर येथे तुम्हाला प्राधान्य मिळू शकते. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 एप्रिल रोजी रोजी 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून contact.hr@mmrcl.com येथे अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी आपल्या अर्जाची प्रत चीफ जनरल मॅनेजर (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल ट्रान्सिस्ट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पश्चिम), मुंबई- 400051 या पत्त्यावर पाठवायचे आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच अर्ज करावा.16 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज केल्यास तो बाद ठरवण्यात येईल याची नोंद घ्या.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई विद्यापीठात विविध 152 अनुदानित शिक्षकीय पदावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे. यामध्ये विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी 4 जागा, प्राध्यापक पदांसाठी 21 जागा, सहयोगी प्राध्यापक/ उप ग्रंथपाल पदांसाठी 54 जागा आणि सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी 73 पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे अनुदानित तत्वावर भरण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्या. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर अर्ज सादर करावे. राखीव पदांचा तपशील, पात्रता, अनुभव आणि इतर नियम व अटी इत्यादी बाबतची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर Career या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी या भरतीसंदर्भात माहिती दिली आहे. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता या पदांसाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक क्र. एएक्युए/आयसीडी/2023-24/853, दिनांक 22 सप्टेंबर 2023 नुसार सदर पदांकरीता ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपले अर्ज 7 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजण्याच्या आत पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अर्जात चुकीची माहिती भरल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास तो बाद करण्यात येईल,याची उमेदवारांनी नोंद घ्या.