Mumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. (Mumbai Sunday Mega Block ) मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाणे-कल्याण आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर जोगेश्वरी-बोरिवली मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या तिन्ही ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
रविवारी सुट्टी असल्याने अनेक जण मुंबईत फिरण्याचा बेत आखत असतात. मात्र, रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते वाशीदरम्यान तसेच जोगेश्वरी ते बोरिवलीदरम्यान ब्लॉक घेतला गेला आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोकल या सुट्टीच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. त्यामुळे लोकल या 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावतील. तसेच अनेक गाड्या रद्द केल्याने आयत्यावेळी प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेचे गाड्यांचे वेळापत्रक पाहून प्रवास करा.
- ठाणे ते कल्याणदरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे.
- त्यामुळे अप आणि डाऊन जलद मार्गावर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात.
- हा मेगाब्लॉक सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत असणार आहे.
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत.
- कुर्ला - वाशीदरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे.
- त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात.
- हा मेगाब्लॉक सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत असणार आहे.
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कालवधीत सीएसएमटी येथून पनवेल-बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाशी, बेलापूर पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. दरम्यान, ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल नियमित सुरु राहणार आहेत.
- पश्चिम मार्गावर बोरिवली ते जोगेश्वरी हा मेगाब्लॉक असणार आहे.
- हा मेगाब्लॉक सकाळी 10.35 ते सायंकाळी 3.45 वाजेपर्यंत असणार आहे.
पश्चिम मार्गावरील मेगाब्लॉक कालवधीत लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पाचव्या मार्गिकेवरील ब्लॉकमुळे 25 मार्च रोजी धावणारी अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस विरार स्थानकापर्यंत धावणार आहे. बोरिवली ते विरारदरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे.