अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच या मार्गावर मेट्रोची चाचणी होणार आहे. पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू करण्याचा MMRDA चा प्रयत्न आहे. तर जानेवारी 2022 पर्यंत मेट्रोचे दोन्ही मार्ग सुरू होतील असा विश्वास MMRDA ने व्यक्त केला आहे. मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 हे दोन्ही मेट्रोचे मार्ग जानेवारी 2022 पर्यंत सुरू होतील असा विश्वास MMRDA चे आयुक्त आर राजीव यांनी व्यक्त केला आहे.
या दोन्ही मेट्रो मार्गावर एकूण 20 किलोमीटर मार्गावर चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. या मेट्रो मार्गावर प्रवास करताना किमान 10 रुपये भाडं मोजावे लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. तर हे दोन्ही मेट्रो मार्ग सुरू झाल्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावरील 20 ते 25 टक्के वाहतूक कमी होईल तर 10 ते 12 टक्के लोकलमधील गर्दी कमी होईल असा दावा आर राजीव यांनी केला आहे.
पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू करण्याचा MMRDA चा प्रयत्न आहे. तर जानेवारी 2022 पर्यंत मेट्रोचे दोन्ही मार्ग सुरु होतील असा विश्वास MMRDA ने व्यक्त केला आहे. मात्र, या मार्गावर किती भाडे असेल याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता निकाली निघाली आहे. या मार्गांवर किमान 10 रुपये भाडे असणार आहे. त्यामुळे कमी पैशात मुंबईकरांना गारेगार प्रवास करता येणार आहे.
मेट्रो 2 ए (Mumbai Metro-2 A)आणि मेट्रो 7 (Mumbai Metro-7)हे दोन्ही मेट्रोचे मार्ग जानेवारी 2022 पर्यंत सुरू होतील असा विश्वास MMRDAचे आयुक्त आर. राजीव यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही मेट्रो मार्गावर एकूण 20 किलोमीटर मार्गावर चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. या मेट्रो मार्गावर प्रवास करताना किमान 10 रुपये भाडे मोजावे लागणार असल्याचं आयुक्त आर. राजीव यांनी स्पष्ट केले आहे. तर Mumbai Metro-2 A आणि Mumbai Metro-7 हे दोन्ही मेट्रो मार्ग सुरु झाल्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावरील 20 ते 25 टक्के वाहतूक कमी होईल तर 10 ते 12 टक्के लोकलमधील गर्दी कमी होईल असा दावा, MMRDAचे आयुक्त आर. राजीव यांनी यांनी केला आहे.