सलाम भावा! डिलीव्हरी बॉयने ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा जीव असा वाचवला

समाजात अशीही माणंस आहेत ज्यामुळे माणूसकी अजूनही टिकून आहे. अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Updated: Feb 2, 2022, 07:22 PM IST
सलाम भावा! डिलीव्हरी बॉयने ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा जीव असा वाचवला title=

मुंबई : रोजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक जीवनात बिजी असतो. अशात दुसऱ्याकडे कुठून लक्ष देणार? धकाधकीच्या आयुष्यात अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला  मदत करतानाही हजार वेळा विचार केला जातो. त्यामुळे माणूसकी हरवत चाललीये की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र समाजात अशीही माणंस आहेत ज्यामुळे माणूसकी अजूनही टिकून आहे. अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (online food delivery boy mrunal kirdat save retired colonel mohan malik life)

डिलीव्हरी बॉयने वाचवले निवृत्त कर्नलचा जीव

सोमवारी, ऑनलाइन फूड डिलिव्हरी App स्विगीने इंस्टाग्रामवर एका डिलिव्हरी बॉयने एका व्यक्तीचा जीव कसा वाचवला हे सांगणारी पोस्ट शेअर केली. डिलीव्हरी बॉयने आपल्या नोकरीच्या पलीकडे जाऊन कशाप्रकारे निवृत्ती अधिकाऱ्याचा जीव वाचवला हे या पोस्टमधून सांगितलं आहे.  

स्वीगिच्या मृणाल किर्दत या तरुणाने निवृत्त कर्नल मनमोहन मलिक यांचा जीव कसा वाचवला हे पोस्टच्या माध्यमातून उलगडलं आहे.

नक्की काय झालं होतं? 

मोहन मलिक 25 डिसेंबर 2021 ला आजारी होते. त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की त्यांना रुग्णालयात हलवण्याची वेळ आली. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना वांद्रेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.   

मोहन मलिक यांचा मुलगा त्यांना कारमधून घेऊन हॉस्पीटलच्या दिशेने निघाला. मात्र वाहतूक कोंडीत ते फसले. वडिलांची प्रकृती खालावत असल्याने मोहन यांचा मुलगा इतरांकडे गाडी घेऊन जाण्यासाठी रस्त मोकळा करुन द्या, अशी विनंती करु लागला. मात्र कोणीच त्याच्या मदतीला धावून आलं नाही. देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात ते काय खोटं नाही.

मोहन यांच्या मदतीसाठी मृणाल देवासारखा धावून आला. या स्विगीच्या डिलीव्हरी बॉयने मदतीचा हात पुढे केला. वाहतूक कोंडीतून दुचाकीवरुन रुग्णालय गाठण्याचा थरार या पोस्टमधून ठळकपणे दिसून येतोय. 

"माझी 25 डिसेंबरला प्रकृती अतिशय खालावली होती. माझ्या मुलाने मला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचं ठरवलं. प्रचंड वाहतूक कोंडी होती.  गाडी जागची हलत नव्हती. आम्ही इंच इंच लढत होतो. माझ्या मुलाने टु व्हिलर चालकांकडे मदतीसाठी विनंती केली, जेणेकरुन आम्हाला कोंडीतून बाहेर पडता येईल आणि रुग्णालयात वेळेत पोहचता येईल. पण कोणीही मदतीसाठी आलं नाही", अशी खंत मोहन यांनी व्यक्त केली. 

"त्या गर्दीत एक स्विगी डिलीव्हरी बॉय होता. मृणाल मला बाईकवरुन रुग्णालयात पोहचवण्यासाठी पुढे सरसावला. रस्ता मोकळा करुन द्या, असं मृणाल जोरजोरात ओरडत होता. अशा प्रकारे आम्ही रुग्णालयात पोहचलो. मृणालने त्वरित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितलं की माझी प्रकृती नाजूक आहे तुम्ही लवकरात लवकर मदत करा", असा हा थरार निवृत्त कर्नल मोहन यांच्या हवाल्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगण्यात आला आहे.  

"अनेक आठवडे रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मी आता ठणठणी आहे. मी फक्त त्या तरुण मुलाबाबत विचार करु शकतो, ज्याने मला जीवनदान दिलं. मृणाल माझ्यासाठी रक्षकासारखा आहे जसं स्विगीही त्याला म्हणते. मृणाल आणि त्याच्यासारख्या अनेक नायकांचा मी आभारी आहे", अशा शब्दात निवृत्त कर्नल मनमोहन मलिक यांनी आभार मानले.        

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swiggy (@swiggyindia)