PayTM ची धमाकेदार ऑफर : १ रुपये खर्च करा, १० रुपयाचा कॅशबॅक मिळवा

पेटीएम आपल्या ऑफरमधून सर्वांनाच आश्चर्यचकीत करत आलं आहे. पुन्हा त्याचप्रकारची एक नवीन ऑफर लोकांसमोर घेवून आले आहेत.

Updated: Nov 28, 2018, 09:13 PM IST
PayTM ची धमाकेदार ऑफर : १ रुपये खर्च करा, १० रुपयाचा कॅशबॅक मिळवा title=

मुंबई : पेटीएम आपल्या ऑफरमधून सर्वांनाच आश्चर्यचकीत करत आलं आहे. पुन्हा त्याचप्रकारची एक नवीन ऑफर लोकांसमोर घेवून आले आहेत. या ऑफरला धमाका ऑफर असं नाव देण्यात आलं आहे. पेटीएमची ऑफर अशी आहे की, १ रुपयाची खरेदी करणाऱ्याला वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या स्टोअरमध्ये १० रुपयाचा कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरची मर्यादा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मर्यादीत असणार आहे. याचा फायदा महिन्यात २ वेळाच घेऊ शकतो. बिग बास्केट, पिझ्झा हट, बिग बाजार, बाटा, फ्लायिंग मशिन आणि वुडलॅन्ड या स्टोअरमध्ये ऑफरचा फायदा मिळू शकतो.

ऑफरचा फायदा कसा मिळवणार?
१) सर्वात अगोदर पेटीएमच्या साईटवर १ रुपयाची खरेदी करा.
२) ऑफरमध्ये समाविष्ट केलेल्या ब्रँड स्टोअरमध्ये एक उत्पादन निवडा.
३) पेमेन्ट करण्यापूर्वी प्रोमो कोड MAGIC अप्लाय करा.
४) तुम्हाला ताबडतोब 10 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

ही ऑफर फक्त काही खास ब्रॅन्डवर उपलब्ध आहे. हल्दीरामच्या स्टोअरमध्ये खरेदी केल्यावर ५० रूपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. यासाठी तुम्हाला किमान १०० 

रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. इतर वेबसाईटवर याचा फायदा घेता येणार नाही.

ही ऑफर फक्त केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांसाठीच मर्यादीत आहे. कॅशबॅक पेटीएमच्या वॉलेटमध्येच जमा होणार आहे. याचा उपयोग शॉपिंग, रिचार्ज, बिल 

पेमेन्ट, मूव्ही तिकीट आणि प्रवासाच्या बुकिंगसाठी केला जाईल.