मुंबई : बॉलिवूडमध्ये लग्नाची रेलचेल सुरू असताना राजकीय वर्तुळातूनही लग्नाचा बॉम्ब फुटणार आहे. ठाकरे कुटुंबात लवकरच शहनाई वाजणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू निहार ठाकरेच लग्न भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील सोबत ठरलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे घराण्यात लवकरच लग्नाची चर्चा अशी बातमी येत होती. मात्र ठाकरे कुटुंबातील कुणाचं लग्न होणार याची माहिती समोर आली नव्हती. (हर्षवर्धन यांची कन्या अंकितासोबत लग्नगाठ बांधणारा हा 'ठाकरे' आहे तरी कोण?)
अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचा विवाह सोहळा 28 डिसेंबरला मुंबईत पार पडणार आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितात हा विवाहसोहळा पार पडेल. तर हर्षवर्धन पाटील यांचं मूळ गाव असलेल्या बावडा वासियांसाठी पाटील यांनी 17 डिसेंबरला भोजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचे समजते.
अंकिता पाटीलने एक वर्ष हार्वर्डमध्ये शिक्षण घेतलं आहे. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं आहे. तर निहार ठाकरे हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतल असून एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. हे शिक्षण घेत असताना अंकिता आणि निहार यांची ओळख झाली होती. (ठरलं ... पश्चिम महाराष्ट्रातल्या या दिग्गज नेत्याची लेक होणार ठाकरेंची सून!)
अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून ते पेशाने वकील आहेत.
अंकिता पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला होता. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या 2019 साली झालेल्या निवडणुकीत अंकिता पाटील विजयी झाल्या होत्या. ही निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकल्यामुळे अंकिता पाटील चर्चेत आल्या होत्या. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.