मुंबई : मुंबईतील किंग सर्कलचे नाव बदलून 'पार्श्वधाम' करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवळे यांनी केल्याने खळबळ माजलीय. जैन मतांसाठी खासदार राहुल शेवाळे यांनी मागणी केल्याचं म्हटलं जातंय. राहुल शेवाळे हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात 'महाराज' या शब्दाचा समावेश केल्यानंतर आणि त्यानंतर एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या 'प्रभादेवी' अशा नामांतरानंतर आता राहुल शेवाळे यांनी 'किंग्ज सर्कल'चंही नाव बदलण्याची मागणी केलीय.