मुंबई : रेल्वे पोलिसाने (Railway Police) आपले पैसे परत मिळवण्यासाठी शिवसैनिक नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांची मदत घेतली. प्रॉपर्टी एजंटकडून साडेसहा लाख रूपये परत मिळवण्यासाठी रेल्वे पोलीस आनंद चव्हाण यांनी शिवसैनिक नितीन नांदगावकर यांची मदत घेतली.
नितीन नांदगावकर यांनीच हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलाय. विशेष म्हणजे चव्हाण यांनी पनवेल पोलिसांकडे तक्रारही केली होती. पण पोलिसांनी तक्रारीची दखलच न घेतल्याने अखेर चव्हाण यांना नांदगावकरांची मदत घ्यावी लागली.
राज्यात कायद्याचं राज्य आहे का असा सवाल यातून उपस्थित झालाय. एका पोलिसालाच याचा अनुभव आलाय. पोलिसाच्या तक्रारीलाच पोलीस वाटाण्याच्या अक्षता लावत असतील तर सामान्य नागरिकाने जायचं कोणाकडे असा सवाल उपस्थित झालाय.
नितीन नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट
मी कुठल्या पोलीस ठाण्यात जाऊन सांगू की बिल्डर मला शिव्या देतो .....
पोलीसांना शिव्या देणाऱ्या बिल्डरांना ठोकावच लागतं ....
|| शिवसेना जनता दरबार ||
बिल्डरांची एवढी हिंमत होते कुठून की ते मुंबई पोलिसांना सरळ सरळ शिव्या घालतात?
पोलिसांना जर बिल्डर जुमानत नसतील तिथं सर्वसामान्य जनतेचे बिल्डरांकडून किती मानसिक खच्चीकरण होत असेल? असं