शहरांमध्ये इंस्टंट कॉमर्स मार्केट अगदी झपाट्याने आपलं जाळ पसरत आहे. अनेक असे ऍप्स आहेत जे 10 ते 15 मिनिटांमध्ये गरजेचे सामान घरी पोहोचवतात. अनेक लोक या सेवेवर पूर्णपणे अवलंबून असतात. अशाच प्रकारचं एक ऍप आहे ते म्हणजे स्विगी इंस्टामार्ट. ज्याचा वापर सर्रास करताना दिसत आहे. पण या स्विगी इंस्टामार्टवरुन स्कॅम झाल्याच एका युझरने म्हटलं आहे.
स्विगी इंस्टामार्टवरुन मागवलेल्या भाजीच्या वजनात फेरबदल झाल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. एका रेडिट युझरने हा दावा केला आहे तसेच त्यांनी स्क्रीनशॉर्ट देखील शेअर केले आहेत. रेडिटवर एका व्यक्तीने लिहिले आहे की, फ्लॉवर 400 ते 600 ग्रॅम लिहिलं होतं पण जी भाजी डिलिव्हरी झाली ती फक्त 145 ग्रॅम होती.
Scam Alert: Underweight vegetables from Instamart
byu/PsyHil89 inswiggy
याशिवाय, युझरने शिमला मिरचीचा एक फोटो शेअर केला आहे ज्याचे वजन ॲपवर 250 ग्रॅम दाखवले गेले होते. तर डिलिव्हरी फक्त 170 ग्रॅम शिमला मिरचीची होती. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्या व्यक्तीने सांगितले आहे की, त्याने श्राद्धाच्या वेळी भाज्या मागवल्या होत्या पण बहुतेक भाज्यांचे वजन कमी होते पण पैसे जास्त खर्च झाले. तक्रार केल्यानंतर स्विगी 177 रुपयांचा अर्धा म्हणजेच 88 रुपये परत करण्याबाबत बोलत आहे.
पण युझरने रिफंड घेण्यास नकार दिला. हे प्रकरण पुढे ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत नेण्याच म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक युझर्सचं म्हणणं आहे की, स्विगी हेरफेर करते तसेच ते ही चूक मान्य देखील करत नाही. अनेक युझर्सचं म्हणणं आहे की, ग्राहकाने कंझ्युमर कोर्टात जाऊन तक्रार करावी.