Video: 18000 कोटींचा मालक मुंबई लोकलने करतो प्रवास; यामागील खरं कारण आलं समोर

Rs 18000 Crore Owner Travels In Mumbai Local Train: या व्यक्तीकडील एकूण संपत्तीचा आकडा पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 22, 2025, 12:20 PM IST
Video: 18000 कोटींचा मालक मुंबई लोकलने करतो प्रवास; यामागील खरं कारण आलं समोर title=
ट्रेनने प्रवास करण्याचा व्हिडीओ आलेला चर्चेत

Rs 18000 Crore Owner Travels In Mumbai Local Train: रिअल इस्टेट इंडस्ट्रीमधील गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीच्या नावावर भारतातील सध्याच्या घडीला आघाडीची बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. रहिवाशी इमारती, डेटा सेंटर्स, इंड्रस्ट्रीज आणि लॉजिस्टीक अशा अनेक क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या या व्यक्तीच्या उद्योग समुहांची किंमत काही लाख कोटींमध्ये आहे तर या व्यक्तीची एकूण संपत्ती काही हजार कोटींमध्ये आहे. असं असतानाही ही व्यक्ती मुंबईमध्ये प्रवास करताना चक्क लोकल ट्रेनचा वापर करते असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे खरं आहे.

कोण आहे ही व्यक्ती?

आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्या व्यक्तीचं नाव आहे निरंजन हिरानंदानी! नावावरुन तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही व्यक्ती हिरानंदानी उद्योग समुहाची सर्वेसर्वा आहे. निरंजन हे हिरानंदानी ग्रुपचे सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वाचे बिझनेस लिडर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच सर्व कंपन्या काम करतात. मागील काही काळामध्ये हिरनंदानी समुहाने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये निरंजन यांच्या नेतृत्वाचा आणि उद्योगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. मात्र एवढ्या मोठ्या कंपनीचं नेतृत्व करणारे निरंजन यांचं रहाणीमान अत्यंत साधं आहे. त्यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात...

18 हजार कोटींचे मालक

हुरुनच्या यादीनुसार, निरंजन हिरानंदानी हे भारतामधील 50 श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. निरंजन यांची संपत्ती 1,21,20,71,00,000 इतकी आहे. म्हणजेच 12129 कोटी 71 लाख इतकी आहे. तर एकूण संपत्ती आणि इतर गोष्टींचा विचार केल्यास निरंजन हिरानंदानी हे 18 हजार कोटींचे मालक आहेत. आलिशान घरांबरोबरच निरंजन यांच्याकडे लक्झरी कार्सचा ताफा आहे. एवढे श्रीमंत असूनही मुंबईच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून मौल्यवान वेळ वाया घालवायला लागू नये म्हणून ते मुंबई लोकलने प्रवास करतात. विशेष म्हणजे सार्वजनिक वाहतूक सेवाचा वापर करताना अनेकजण त्यांना ओळखतही नाहीत. "त्यांच्या जाणकार गुंतवणूक धोरणांसाठी आणि नेतृत्व गुणासंदर्भातील घडामोडींसाठी ते ओळखले जातात. त्याचे आर्थिक यश हे रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक दशकांचं समर्पण आणि कठोर परिश्रमातून मिळालेलं आहे," असं हिरानंदानींच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे. "त्यांच्या प्रयत्नांनी केवळ मुंबईचा कायापालट केला आहे असं नाही तर शहरी राहणीमानालाही एक विशेष दर्जाही प्राप्त करुन दिला आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा, शाश्वत राहणीमान आणि ऐश्वर्य संपन्न जीवनशैली त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेकांच्या आवाक्यात आली आहे," असंही निरंजन हिरानंदानींबद्दल वेबसाईटवर लिहिलेलं आहे. 

...अन् बांधकाम व्यवसायात केला प्रवेश

निरंजन हिरानंदानी यांनी कष्टाने अगदी शुन्यापासून आजपर्यंतचं यश मिळावलेलं आहे. निरंजन हिरानंदानी यांना सेल्फ मेड अब्जाधीश म्हणूनही ओळखलं जातं. निरंजन हिरानंदानी यांनी सीए होण्यासाठी अभ्यास केल्यानंतर आपल्या भावाबरोबर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या हिरानंदानी समुहाची स्थापना केली. वाणिज्य क्षेत्रात काही वर्षे कार्यरत राहिल्यानंतर निरंजन हिरानंदानी यांनी आपल्या भावासोबत हिरानंदानी ग्रुपची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. पुढे 1981 मध्ये हिरानंदानी यांनी कापड उद्योगात एन्ट्री केली. कालांतराने, हिरानंदानी यांनी आपले संपूर्ण लक्ष रिअल इस्टेट उद्योगाकडे वळवले आणि आज ते मुंबईसारख्या भारतातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक असलेल्या रिअल इस्टेट मार्केटमधील महत्त्वाचे बिल्डर म्हणून ओळखले जातात.