मुंबई : विरारमध्ये विजय वल्लभ कोव्हिड सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. कोव्हिड सेंटर जळीत कांडामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी नंतर रुग्णालयाच्या दोन व्यवस्थापक डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
डॉ. शैलेश पाठक आणि डॉ. दिलीप जैन यांना पोलिसांनी अटक केली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---------------
लसीकरणाचा पुढचा टप्पा 1 मे पासून! या तारखेपासून नोंदणीला होणार सुरूवात
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तीसरा टप्पा म्हणजेच 18 ते 45 वर्षाच्या नागरिकांसाठी 1 मे पासून सुरू होणार आहे. यासाठी 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे.
1 मे पासून देशातील सर्व 18 ते 45 वर्षाच्या नागरिकांसाठी लसीकरण उपलब्ध असणार आहे. त्यासाठी 28 एप्रिल पासून नोंदनी करता येणार आहे.