मद्यधुंद तरुणीचं पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन, रस्त्यावर तुफान राडा; व्हिडीओ व्हायरल

आधी पोलिसाची कॉलर पकडली मग दमदाटी केली, मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात तुफान राडा

Updated: Jun 20, 2022, 05:04 PM IST
मद्यधुंद तरुणीचं पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन, रस्त्यावर तुफान राडा; व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : पोलीस मदतीसाठी पुढे येतात. ऊन पाऊस कशाचाही विचार न करता ते कायम सेवेसाठी तत्पर असतात. मात्र प्रामाणिकपणे आपली ड्युटी करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही संताप येईल. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी पोलीस अधिकारीची कॉलर पकडल्याचं दिसत आहे. पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्याच्या जवळ जाते. तेव्हा ते तिचा हात सोडवतात. त्यानंतर तरुणी लाथ मारते. तरुणीने भररस्त्यात राडा घातला. 

हा व्हिडीओमध्ये तरुणीचा आवाज स्पष्ट येत नाही. मात्र तिच्या देहबोलीवरून ती नशेत असल्याचं लक्षात येत आहे. ही तरुणी पोलीस अधिकाऱ्याची कधी कॉलर पकडण्याचा प्रयत्न करते तर मध्येच लाथ मारण्याचा प्रयत्न करते. 

हा व्हिडीओ कुठला आहे याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. झी 24 तासने या व्हिडीओची कोणतीही खातरजमा केली नाही.