गिरगाव व्हाया दादर....

अमोल भोर दिग्दर्शित गिरगांव व्हाया दादर या नाटकाचे नुकतेच २५ प्रयोग पूर्ण झाले. या नाटकातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधोरेखित करण्यात आला आहे आजच्या तरुणपिढीला आधुनिकीकरणाचं आकर्षण, 3D पिक्चर्स, रॉकिंग गाणं हेच त्यांचं आयुष्य.

Updated: Jan 3, 2012, 08:04 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

अमोल भोर दिग्दर्शित गिरगांव व्हाया दादर या नाटकाचे नुकतेच २५ प्रयोग पूर्ण झाले. या नाटकातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधोरेखित करण्यात आला आहे आजच्या तरुणपिढीला आधुनिकीकरणाचं आकर्षण, 3D पिक्चर्स, रॉकिंग गाणं हेच त्यांचं आयुष्य. महाराष्ट्राचा इतिहास काय, महाराष्ट्रासाठी किती लोकांनी हुतात्म पत्कारलं हे आजच्या तरुण पिढीला माहितच नाही, मात्र याचीच माहिती देणारं एक सुंदर नाटक म्हणजे गिरगांव व्हाया दादर.

 

संयुक्त महाराष्ट्राची धग ज्यांनी जवळून पाहिली, ज्यांनी या लढ्यात आपलं रक्त सांडलं त्या हुतात्म्यांना या नाटकातून सलाम करण्यात आला आहे. संयुक्त महाराष्टाचा लढा या नाटकाद्वारे पुन्हा जीवंत करण्यात आला आहे. या नाटकाचा २५ वा प्रयोग नुकताच पार पडला.

 

केश कोळी लिखित हे नाटक अमोल भोर यांनी दिग्दर्शित केलं आहे. या नाटकाने २५ व्या प्रयोगापर्यंत मजल मारली असली तरी असेच या नाटकाचे उत्तरोत्तर प्रयोग रंगत जावोत असा विश्वास या नाटकाच्या टीमने व्यक्त केला आहे.