www.24taas.com, मुंबई
बॉलीवूडमध्ये म्युझिक चोरी करण्याचा प्रकार काही नवा नाही आहे. असचं एक म्युझिक चोरीचा आणखीन एक प्रकार समोर आला आहे. हाउसफुल-२ या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर साजिद वाजिद यांनी आपला म्युझिक चोरल्याचा आरोप प्रसिद्ध गायक अभिजीत यांनी केला आहे.
शुक्रवारी रिलीज होणाऱ्या हाउसफुल या चित्रपटाचं म्युझिक ( म्युझिक ऑफ दॅट सॉँग..) आता दहा वर्षापुर्वी म्युझिक डायरेक्टर आणि सिंगर अभिजीत भटाचार्या यांनी तयार केलेल्या या गाण्याचा म्युझिक यात बरचं साम्य असल्याचे अभिजीत याचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांनी मुझ्यिक चोरला गेल्याचा आरोप केला आहे.
अभिजीत यांनी तयार केलेल्या सुपरहिट म्युझिकला हाउसफुल चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर साजिद-वाजीद यांनी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिजीत यांनी आरोप केला आहे की, साजिद वाजिद या म्युझिक डायरेक्टरचा जोडींने त्यांना न विचारता त्यांनी हा म्युझिक हाउसफुल गाण्यात वापरला आहे. ते ही एक दोन वेळा नाही तर तब्बल ४२ वेळा साजिद वाजिदने आपल्या गाण्यात या तालाचा वापर केला आहे.
अभिजीतने म्युझिक चोरीचा या प्रकाराचा विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिजीतने सांगितलं कि, आज बहुतेक लोक दुसऱ्याचं म्युझिक चोरी करतात. चोरी करणाऱ्या अशा म्युझिक डायरेक्टर्सना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अभिजीतने केली आहे. मंगळवारी हायकोर्ट अभिजीतचा याचिकेवर निर्णय देण्याची शक्यता आहे..