पेट्रोलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. महागाईच्या काळात आम आदमीला आणखी एक झटका बसणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी वाढ आणि रुपयाचं अवमुल्यन झाल्यानं तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 1 रुपये 80 पैशांची वाढ करण्याची मागणी केली आहे. सप्टेंबर महिन्यात पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा दरवाढीची मागणी होत असल्यानं महागाईनं त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे. पेट्रोलमध्ये कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळंच पेट्रोलच्या दरात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.