www.24taas.com, झारखंड
झारखंडमधील गरवा जिल्ह्यातील बरिगनवा जंगलात नक्षलवाद्यांनी शनिवारी पोलिसांची दोन वाहनं सुरूंगस्फोटानं उडवून दिली. या हल्ल्यात १३ पोलीस शहीद झाले तर दोन जण गंभीर जखमी झालेत.
मृतांमध्ये भंडारिया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांच्या बंदुका घेऊन माओवादी पसार झाले. आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी या भागातील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. शनिवारी त्यांनी ‘रास्ता रोको’ही केला.
या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी भंडारियाचे गटविकास अधिकारी वासुदेव प्रसाद आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा मेहता यांचा ताफा जात असतांना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला.