नरेंद्र मोदींचा 'टाईम' येणार आहे

टाईम या प्रतिष्ठित मासिकाने आपल्या आशियाई आवृत्तीत मोदींवर कव्हर स्टोरी केली आहे.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या राहुल गांधींनी आव्हान देऊ शकतात असं टाईम मासिकाने म्हटलं आहे. नुकत्याच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मोदी येत्या संसदेच्या निवडणुकीत राहुल गांधींना आव्हान देऊ शकतात असं टाईमने म्हटलं आहे.

Updated: Mar 18, 2012, 09:39 AM IST

www.24taas.com, वॉशिंगटन 

टाईम या प्रतिष्ठित मासिकाने आपल्या आशियाई आवृत्तीत मोदींवर कव्हर स्टोरी केली आहे.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या राहुल गांधींनी आव्हान देऊ शकतात असं टाईम मासिकाने म्हटलं आहे. नुकत्याच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मोदी येत्या संसदेच्या निवडणुकीत राहुल गांधींना आव्हान देऊ शकतात असं टाईमने म्हटलं आहे.

पुढील सार्वत्रिक निवडणुकांसाठी केवळ दोन वर्षेच उरली असताना काँग्रेसला राहुल गांधी पक्षाला नवसंजीवनी देतील अशी आशा होती. पण उत्तर प्रदेशातील पक्षाच्या पराभवामुळे त्यांच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. "Modi Means Business. But can he lead India?" अशी या स्टोरीची हेडलाईन आहे. टाईमच्या मुखपुष्ठावर मोदींचे गंभीर भासणारं छायाचित्र छापण्यात आलं आहे. मोदींनी गुजरातवर गेली दहा वर्षे अधिराज्य गाजवलं आहे. ज्योती थोट्टम यांच्या कव्हर स्टोरी 61 वर्षीय मोदींची कामगिरी पाहता राहुल गांधींनी आव्हान देऊन शकणारे ते एकमेव प्रतिस्पर्धी असल्याचं म्हटलं आहे.

या अंकात मोदींची मुलाखतही छापण्यात आली आहे. मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गुजरातच्या विकासावर या कव्हर स्टोरी भर देण्यात आला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात हे देशातील औद्योगिकदृष्ट्या विकसीत राज्य म्हणून पुढे आलं असल्याचं तसंच जमीन संघर्ष आणि भ्रष्टाचारापासून मुक्त राहिल्याचा उल्लेखही या लेखात आहे. नैसर्गिक साधन संपत्ती तसंच सूपीक जमीन नसतानाही गुजरातची आर्थिक भरभराट मोदींच्या नेतृत्वागुणांमुळे झाला. मोदींचे विरोधकही मोदींच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गुजरातने यश संपादन केल्याचं मान्य करतात असं मासिकाने म्हटलं आहे.

टाईमने गुजरातचा दंगलीचा उल्लेख करत त्यातील पीडितांना अद्याप न्याया मिळाला नसल्याकडे लक्ष वेधलं आहे. तसंच एहसान जाफरी या माजी खासदार आणि 200 लोकांच्या हत्येच्या खटल्यात मोदींनी निष्क्रियता दाखवल्याप्रकरणी खटला चालू असल्याचाही उल्लखे लेखात आहे.

पण मोदींची वेगाने निर्णय घेण्याची क्षमता, कर्तव्यकठोर कार्यशैलीमुळे ते देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतात असंही टाईमने म्हटलं आहे.