लोकपाल पुन्हा लटकले, अण्णा उपोषण करणार

लोकपाल विधेयक राज्यसभेत लटकलं आहे. मोठ्या विरोधानंतर सिलेक्ट कमिटीकडे बिल पाठवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झालं आहे. सरकारच्या प्रस्तावाला आवाजी मतदानानं मंजूरी देण्यात आली.

Updated: May 21, 2012, 07:18 PM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली

लोकपाल विधेयक राज्यसभेत लटकलं आहे. मोठ्या विरोधानंतर सिलेक्ट कमिटीकडे बिल पाठवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झालं आहे. सरकारच्या प्रस्तावाला आवाजी मतदानानं मंजूरी देण्यात आली.

लोकपाल विधेयकला सिलेक्ट कमिटीकडं पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. संसदीय कामकाज राज्यमंत्री नारायण सामी यांनी याबाबतचा प्रस्ताव आहे. यावरून राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी सरकारवर टीका केली. सरकार हे विधेयक आणणार की नाही हे त्यांनी जाहीर करावं अशी मागणी जेटली यांनी केली आहे.

तर विधेयकामधल्या प्रत्येक सुधारणेवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा माकपचे सीताराम येचुरी यांनी व्यक्त केली. बसपानं सरकारच्या प्रस्तावाचं समर्थन केलं आहे. सुधारीत लोकपाल विधेयक राज्यसभेत सादर झाल्यावर गदारोळ झाला आहे. त्यामुळं लोकपाल बिल पुन्हा एकदा लटकले आहे. सरकारच्या निषेधार्थ टीम अण्णा २५ जुलैपासून जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे.