अण्णांच्या आंदोलनाला सूट देऊ नका - माणिकराव

अण्णा हजारे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा आंदोलनासाठी सज्ज झाले असल्याने काँग्रेस पुन्हा धासतावले आहेत असेच दिसून येते, कारण की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अण्णाचे मुंबईत MMRDA मैदानात होणारे आंदोलनाला कोणत्याच प्रकारची सूट देऊ नये असे वक्तव्य केले आहे.

Updated: Dec 22, 2011, 05:23 AM IST

झी २४ तास वेब टीम, नांदेड

अण्णा हजारे यांनी जनलोकपालसाठी सरकारविरोधी दंड थोपटल्यानंतर, सरकारचे धाबे चांगलेच दणाणले, त्यामुळे अण्णाच्या या लोकपाल आंदोलनाला सरकार येनकेन प्रकारे दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. याआधी केलं गेलंल आंदोलन चांगलच गाजल होतं त्यामुळे सरकारने अण्णांचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसते,

अण्णा हजारे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा आंदोलनासाठी सज्ज झाले असल्याने काँग्रेस पुन्हा धासतावले आहेत असेच दिसून येते, कारण की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अण्णाचे मुंबईत MMRDA मैदानात होणारे आंदोलनाला कोणत्याच प्रकारची सूट देऊ नये असे वक्तव्य केले आहे.

अण्णांना मुंबईतल्या MMRDA मैदानासाठी शुल्कात कुठल्याही प्रकारची सूट देऊ नये, असा पवित्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतला आहे. नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत माणिकरावांनी ही मागणी केली आहे. अण्णांनी MMRDA च्या मैदानावर उपोषणासाठी जागा मागितली आहे, तसंच या मैदानाचं शुल्क कमी करावं, अशी मागणीही अण्णांनी केली आहे. मात्र, टीम अण्णांचे सदस्य गब्बर आहेत, त्यांना शुल्कात सूट देण्याची गरज नाही, असं सांगत माणिकरावांनी शुल्क सवलतीला विरोध दर्शवला आहे.