डोंबिवलीत दरोडा सत्र, पोलीस मात्र झोपेत गर्क..

डोंबिवलीत दरोड्यांच सत्र सुरुच आहे. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कालच दरोडा पडला होता. त्यानंतर आजही याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा पडलाय. खोनी गावात हा दरोडा पडला असून साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेण्यात आला.

Updated: Nov 28, 2011, 12:23 PM IST

झी २४ तास वेब टीम, डोंबिवली

 

डोंबिवलीत दरोड्यांच सत्र सुरुच आहे. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कालच दरोडा पडला होता. त्यानंतर आजही याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा पडलाय. खोनी गावात हा दरोडा पडला असून साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेण्यात आला. तर दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. डोंबिवलीत दरोड्याचे सत्र सुरूच आहे त्यामुळे डोंबिवलीकर मात्र त्रस्त झाले आहेत. खोणी गावात  काल पडला होता सशस्त्र दरोडा.

 

या दरोड्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत,  घराची खिडकी तोडून घरामध्ये दरोडेखोरांनी केला होता प्रवेश, परवा झालेल्या दरोडेखोरीमध्ये माजी आमदार हरिश्चंद्र पाटील व त्यांचा मुलगा दरोडेखोरांना विरोध करताना जखमी झाली आहे. काल जलाराम मंदीर भागात पडला होता दरोडा. त्यामुळे डोंबिवलीकरांची सुरक्षा ही 'रामभरोसे' आहे. परंतु पोलीस मात्र अगदीच उदासिन असल्याचे आढळते.