कोळसा खाणीत कामगाराचा करुण अंत

चंद्रपूर शहरालगतच्या पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत झालेल्या एका भीषण अपघातात एका कोळसा कामगाराचा करुण अंत झाला. अशोक कांबळे असं या कामगाराचं नाव असून तो कोळसा उत्खनन करणा-या पोकलेन या अवाढव्य मशीनवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.

Updated: Jun 2, 2012, 08:16 AM IST

www.24taas.com, पद्मापूर

चंद्रपूर शहरालगतच्या पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत  झालेल्या एका भीषण अपघातात एका कोळसा कामगाराचा करुण अंत झाला. अशोक कांबळे असं या कामगाराचं नाव असून तो कोळसा उत्खनन करणा-या पोकलेन या अवाढव्य मशीनवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.

या मशीन सह एका अजस्त्र कोळसा वाहू वाहन व एक ड्रील मशीन असे साहित्य या कामगाराच्या आसपास कोळसा उत्खनन करत होते. मात्र कोळसा उत्खनन करत असताना अचानक २०० फूट उंचीवर असलेल्या एका ढिगा-याच्या आतून पाण्याचा  एक जोरदार प्रवाह धबधब्या सारखा हे साहित्य असलेल्या ठिकाणी कोसळला.

या घटनेत पोकलेन मशीन ऑपरेटर अशोक कांबळे यांना मशीनमधून बाहेर  पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यांचा पाण्यासह आलेल्या मातीयुक्त दलदलीच्या गाळात फसून मृत्यू झाला. या दलदलीत गडप झालेल्या मशीन्सची किंमत २ कोटी रू. असून या मुळे वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडला मोठे नुकसान सहन करावे लागणारेए.